– ट्रॉफिक गार्डन क्लब तर्फे गुढीपाडवा साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. भावना सोनकुसळे ( निवृत्त डे डायरेक्टर) यांच्या हस्ते श्री प्रभू रामाच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. इंगोले (निवृत्त डे.सुपरीटेंड पोलीस) यांनी भजन तर डॉ. मंडलेकर यांनी भक्तगीत आणि गजानन मेंढेकर (निवृत्त कार्यकारी अभियंता) यांनी गीत रामायण सादर केले व श्रोत्यांना आनंदित केले. त्यानंतर घवघवे ( व्हॉइस चान्सलर) यांनी देहदानाचे महत्त्व समजावून सांगून कार्यक्रमाची सांगता प्रसाद वाटपाने करण्यात आली.








