Wednesday, March 25, 2026
spot_imgspot_img
spot_img

भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच ‘अस्मिता लीग’ महिला तलवारबाजी स्पर्धेचा थरार; १३० रणरागिणींचा सहभाग

– खेलो इंडिया अंतर्गत आयोजन; विविध वयोगटातील विजेत्यांचा गौरव

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- केंद्र शासनाच्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत आणि जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या पुढाकाराने भंडारा जिल्ह्यात प्रथमच आयोजित ‘अस्मिता लीग’ महिला तलवारबाजी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेने जिल्ह्यातील महिला क्रीडा क्षेत्राला एक नवी ओळख मिळवून दिली आहे.

या ऐतिहासिक स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला नगर परिषद नगराध्यक्ष मधुरा मदनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर नगर परिषद उपाध्यक्ष चंद्रकला भोपे, ज्येष्ठ पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर, चेतन भैरम, अजय मेश्राम, विलास केजरकर, एकविध क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत इलमे, जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष संजय बांडेबुचे, सचिव सुनील कुरंजेकर, सामाजिक कार्यकर्ते कृष्णाजी उपरीकर आणि योगेश कुंभारे उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत रोपटे आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले.

ही स्पर्धा १४ वर्षे, १९ वर्षे आणि वरिष्ठ (सिनियर) अशा तीन वयोगटात पार पडली. जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या १३० युवती व महिला खेळाडूंनी ‘फॉइल’, ‘एपे’ आणि ‘साब्रे’ या प्रकारांमध्ये आपल्या तलवारबाजीचे कौशल्य दाखवले.

ज्ञांदा सेलोकर, विहाना सुरकर, आयाना श्रीवास्तव, काव्या शिरके, साक्षी झुरमुरे, वेदश्री पोलो यांनी विविध प्रकारांत यश संपादन केले.

१७ वर्षे वयोगट: ज्ञांदा सेलोकर, एशा व्यवहारे, सना मंसुरी, अंतरा दांभरे, यिशु गभणे, श्रावणी मोजरकर यांनी पदके पटकावली.

१९ वर्षे वयोगट: प्राजक्ता गाढवे, मंजिरी तांबे, वेदांती कुरंजेकर, सना मंसुरी, प्रिंसी शहारे, यिशु गभणे, श्रेया भाजीपाले यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले.

वरिष्ठ गट (सिनियर): मंजिरी तांबे, प्राजक्ता गाढवे, नंदिनी राठोड, प्रिंसी शहारे, वैभवी संगीतराव, सुरभी चकोले यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर विजय मिळवला.

विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते मेडल आणि बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना खेळाचे महत्त्व आणि महिला सक्षमीकरणावर प्रकाश टाकला.

स्पर्धेचे पंच म्हणून सौरभ तोमर, तन्नु डुंभरे, निलोफर पठाण, क्रिश परसोडकर, श्रेयश कुरंजेकर, चेतन वाकेकर, तन्मय लांजेवार, भुनेश नागोसे आणि शौर्य बान्ते यांनी चोख कामगिरी बजावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील कुरंजेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौरभ तोमर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राजक्ता गाढवे, आरोह नागदेवे, रित्विक हुमने, ज्ञानेश गायधने, आयुष पाटील, आयुध कोकाटे, अवि कडव, आदर्श कडव, निरव किरपान या खेळाडूंनी विशेष सहकार्य केले. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील तलवारबाजी क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com