– ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास सुरुवात ; 16 एप्रिल अंतिम मुदत
नागपूर :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे मार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता ‘माहाटेट’ परीक्षा 21 जून 2026 रोजी होणार आहे.परिक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया 27 मार्च रोजी 2026 पासून सुरु झाली असून 16 एप्रिल 2026 पर्यंत परीक्षार्थ्यांना आवेदनपत्र भरता येतील, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.
इयत्ता.1ली ते 5 वी (पेपर 1) व इ.6 वी ते इ.8वी (पेपर 2) साठी सर्व परीक्षा मंडळे ,सर्व माध्यम अनुदानित /विना अनुदानित,कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक/ शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ‘माहाटेट’ ही परीक्षा उतीर्ण होणे अनिवार्य आहे.यानुसार ‘महाटेट 2026 परिक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी 27.मार्च ते दि.16.एप्रिल 2026 हा आहे.प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट 09 ते दि.21 जून 2026 या कालावधीत घेता येणार आहे व शिक्षक पात्रता परीक्षा पेपर -1 21.जून 2026 रोजी सकाळी 10.30 ते 1 वाजेपर्यत घेण्यात येणार आहे.तसेच शिक्षक पात्रता परीक्षा पेपर- 2 याच दिवशी दुपारी 2.30 ते 5 वाजेपयत घेण्यात येणार आहे.
काही प्रशासकीय अडचणींमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.परीक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द केली जाईल,असे महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडून सागण्यात आले आहे.