कन्हान :- कामधंदा मिळत नसल्यामुळे राकेश सुर्यवंशी या युवकाने बेरोजगारी च्या मानसिक त्रासाला कंटाळुन बोरडा रोड कडील रामटेक रेल्वे लाईन वर रात्री रेल्वेने कटुन आत्महत्या केल्याची घटना सामोर आली आहे.
देविदीन शिवपाल सुर्यवंशी वय ५५ वर्ष राह. सुखदेवे कॉलोनी, जे.एन. हॉस्पीटल जवळ वार्ड क्र.४ कांद्री यांचा मुलगा राकेश देविदीन सुर्यवंशी वय २८ वर्ष हा बेरोजगारीमुळे कुठलाही कामधंदा मिळत नसल्याने रिकामा इकडे-तिकडे कामाच्या शोधात फिरत असल्याने मानसिक तणावात राहत होता. गुरूवार (दि .२६) ला रात्री ला राकेश हा जेवन करून घरा जवळील मंदीरात बसला होता परंतु रात्री १० वाजता तेथुन तो निघुन गेला. फिर्यादी मनोज सुर्यवंशी घरी झोपले असताना रात्री १२.१० वाजता म्हणजे शुक्रवार (दि. २७ ) मध्यरात्री त्याचा पुतण्या रितेष राममनोहर सुर्य वंशी याने फोन करून सांगितले की, राकेश सुर्यवंशी हा जे.एन. हॉस्पिटल सामोर शक्ती नगर कांद्री बोरडा जाणा-या रस्त्या वरील रामटेक रेल्वे लाईनवर रेल्वेने कटुन मृत्यु झाला आहे. असे माहित होताच काका मनोज सुर्यवंशी यांनी घटनास्थळी जावुन पाहिले तर राकेशचे डोके रेल्वे रूळा मध्ये तर रूळा बाहेर त्याचे शरीर पडले दिसले. यावरून राकेश ने बेरोजगारी ला कंटाळुन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी कन्हान पोलीसानी पोहचुन पंचनामा करून मृतदेह शवविच्छे दना करिता उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे पाठवि ला. फिर्यादी काका मनोज शिवपाल सुर्यवंशी वय ३८ वर्ष राह. सुखदेवे कॉलोनी, जे.एन. हॉस्पिटल जवळ वार्ड क्र ४ कांद्री मृतकाचा काका याचा तोडी बयाणा वरून कन्हान पोलीसानी मर्ग चा गुन्हा नोंद करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.