Saturday, March 28, 2026
spot_imgspot_img
spot_img

जिल्ह्यात मुबलक इंधनसाठा उपलब्ध ; अफवांवर विश्वास ठेऊ नये

– जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन

यवतमाळ :- मध्यपूर्व आशिया, अमेरिका आणि युरोपियन खंडातील सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याच्या अफवा पसरत असताना, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या तीनही कंपन्यांकडून इंधन साठा पुरेसा असल्याची खात्री देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि ऑईल कंपन्या समन्वयाने काम करत असून पेट्रोल-डिझेलचा साठा अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही सांगण्यात आले.

२७ मार्च रोजीच्या अहवालानुसार, जिल्ह्यात एकूण ६७५ किलोलीटर पेट्रोल आणि ८०९ किलोलीटर डिझेल साठा उपलब्ध आहे. तसेच ४७५ किलोलीटर पेट्रोल आणि ११०० किलोलीटर डिझेलचा साठा वाहतुकीत (इन ट्रान्झिट) आहे.

कंपनीनिहाय साठा चौकट

हिंदुस्थान पेट्रोलीयम १८८ किलो लिटर, डिझेल २५१ किलो लिटर, (इन ट्रान्झिट पेट्रोल १७५ किलो लिटर, डिझेल ३१० किलो लिटर,भारत पेट्रोलीयम १७० किलो लिटर, डिझेल २८० किलो लिटर, (इन ट्रान्झिट पेट्रोल १५० किलो लिटर, डिझेल ४०० किलो लिटर, इंडियन ऑईल ३१७ किलो लिटर, डिझेल २७८ किलो लिटर, (इन ट्रान्झिट पेट्रोल १५० किलो लिटर, डिझेल ३९० किलो लिटर, जिल्हाधिकारी विकास मीना यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार असल्याने घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com