किशोर साहू, मौदा :- मौदा तालुक्याच्या सीमेवर स्थित पारशिवनी तालुक्यातील गट ग्रामपंचायत खंडाळा ( बटाटे )अंतर्गत येणाऱ्या गहू हिवरा येथे मागील 51 व्या वर्षी प्रमाणे यंदाही रामनवमी उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी माजी जि प सदस्य व्यंकटेश कारेमोरे सह गाव परिसरातील मान्यवर, युवक, युतीक ,महिला, पुरुष बाल गोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हनुमान मंदिर पंचकमेटी अध्यक्ष दुर्योधन ठाकरे, सेवकराम लुहूरे,, शेषराव ठाकरे, विठ्ठल नवघरे, जगदीश लुहूरे, सरपंच स्वप्निल बोरकुटे,गिरीधर लुहूरे,वसंतराव मसार,अखाडू मेश्राम,दिनकर महाले,अरुण मौतकार, सुनील लुहूरे,महेंद्र दोडके,सुधाकर साबरे,अर्जुन ठाकरे,युवराज लुहूरे, बाबाराव साबरे,खुशाल आपुरकर,शालिक शेंडे सह समस्त गावकरी मंडळींनी उपस्थित राहून सहकार्य केले.