Saturday, March 28, 2026
spot_imgspot_img
spot_img

कर्माचं फळ या जन्मातच भोगावं लागतं : अंधारे आक्रमक!

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी राज्या महिला आयोगाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला आहे. काल रात्री उशीरा त्यांनी सोशल मीडियावर राजीनाम्याची प्रत प्रसिद्ध करून राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. अशोक खरात प्रकरणावरून त्यांच्यावर राजकीय चिखलफेक झाल्याने त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर आला होता. यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठकही झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र, आता यावर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली.

राजीनामा देताना रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?

“खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे”, असं रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर, “मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. त्याचा आपण स्वीकार करावा”, अशा एक-दोन ओळीतच राजीनामा लिहिला आहे.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

“हा राजीनामा नाही; गच्छंती आहे…!”, अशा एका ओळीतच सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांवर टीका केली आहे.

अंजली दमानियांचीही टीका

“एक ओळीचा राजीनामा… सुनेत्रा पवार मनात म्हणत असतील “मी तर वाटच पाहत होते”, असं अंजली दमानिया म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, “हा राजीनामा समर्पित… डॉ. संपदा मुंडेंना, ज्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा प्रयत्न ह्यांनी केला. त्या प्रत्येक महिलेला ज्यांच्या वेदनांना न्याय मिळाला नाही. त्यांनाही ज्यांची प्रकरणे दाबली गेली. कर्माचे फळ चुकत नाही. ह्याच जन्मात भोगावं लागतं.”


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com