नागपूर :- मनपा आरोग्य केंद्र भरतवाडा यू पी एच सी ला वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती सौ मनीषा अतकरे यांनी भेट देऊन आरोग्य केंद्राची पाहणी केली व आपली 14 वर्षीय मुलगी पूर्वी अतकरेला HPV लस देऊन मनपाद्वारे राबविण्यात येत असलेल्या महत्त्वपूर्ण लसीकरण अभियानात सक्रीय सहभाग नोंदविला.सोबतच नागपूर शहरातील सर्व भगिनींना आव्हान केले कि त्यांनी पण आपल्या 14 वर्ष पूर्ण झालेल्या व 15 वर्ष खालील मुलींना HPV लसीकरण करावे.सर्व मातृ शक्ती ला निवेदन करण्यात आले कि कोणत्याही अफवा ला बळी न पडता आपल्या मुलींना ही लस द्यावी जेणेकरून त्यांचे भविष्य सुरक्षित होईल कारण भारतात महिलांना होणाऱ्या आजारा पैकी सर्वाकल कॅन्सर आजार हा क्रमांक एक चा आजार आहे. त्यामुळे मोदी सरकार नि ही लस मातृशक्ती च्या सुरक्षा साठी निशुल्क ठेवलेली आहे.वैज्ञानिक सर्वे नुसार भारतात हा आजार दर वर्षी एक लाख वीस हजार महिलांना होतो व 80 हजार महिला मृत्यू मुखी होतात.त्यामुळे मनीषा अतकरे सर्व पालकांना विनंती करण्यात आली कि मुलींचे आरोग्य ची सुरक्षा बघता अनुभवी डॉक्टर च्या मार्गदर्शनात सरकारी आरोग्य सेंटर ला जाऊन ही लस घ्यावी व आपल्या मुलीचे आरोग्य सुरक्षित करावे याची सुरवात मी आपल्या घरूनच केलेली आहे व आपण सुद्धा करावी अशा प्रकार चे आव्हान सर्व पालकांना करण्यात आले.यावेळी प्रामुख्याने उपस्थित मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ ख्वाजा सर,आरोग्य केंद्र प्रमुख डॉ मासुम बिरंजन,भाजपा प्रभाग अध्यक्ष शैलेश शाहू सर्व परिचारिका .



