नागपूर :- चंद्रकिरण नगर हुडकेश्वर येथील श्री हनुमान मंदिर पंच कमिटी च्यावतीने श्रीमद् भागवत कथेचे आयोजन 26 मार्चपासून तर 2 एप्रिल या दरम्यान करण्यात आलेले आहेत. ह. भ. प. अनंत महाराज, (पाखोडे शास्त्री) यांच्या मार्गदर्शनाखाली वस्तीतील सर्व नागरिकांनी श्रीमद् भागवत कथेचा रोज सायंकाळी ४ ते ७ च्या दरम्यान, श्रीमद् भागवत कथेचा भक्तांनी लाभ घ्यावा.आणि गोपाल काल्याचे किर्तन अनंत महाराज यांचे वाणीतून 2 एप्रिल रोजी आयोजित केली असून लगेच भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भक्तांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्री हनुमान मंदिर पंचकमेटीने केले आहे.



