रक्तदानाच्या महायज्ञाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई २३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवारी राज्यातील पक्षाच्या सर्व मंडलांमध्ये महारक्तदानाचा उपक्रम राबवण्यात आला. पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील 1000 हून अधिक मंडलांमध्ये एक लाखांहून अधिक बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले होते. त्याला अनुसरून समाजाप्रती असलेल्या बांधिलकीच्या भावनेने प्रदेश भाजपातर्फे पक्षाच्या संघटना रचनेतील सर्व मंडलांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान हेच श्रेष्ठदान या सामाजिक जाणीवेतून ठिकठिकाणी वाढदिवसाचे औचित्य साधत झालेल्या शिबीरांमध्ये रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदानातून फडणवीस यांना वाढदिवसाचे अभीष्टचिंतन केले. मुख्यमंत्री फडणवीस यांना रक्तदानाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक मंडलामध्ये किमान 100 रक्तदानाचे लक्ष्य साध्य करत वाढदिवसानिमित्त सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते सामाजिक कार्यात सहभागी झाले.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या रक्तदान शिबीरावेळी ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर, कृपाशंकर सिंह, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, ओमप्रकाश चौहान, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.




