हजरत बाबा ताजुद्दीन महाविद्यालयात राष्ट्रीय बहु-विद्याशाखीय परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
49

नागपूर :- ताजाबाद शरीफ येथील हजरत बाबा ताजुद्दीन कला आणि वाणिज्य महाविद्यालयात २३ व २४ मार्च रोजी आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिषदेचा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला. देशभरातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ही परिषद ज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष यांचा संगम ठरली. मानविकी, सामाजिक शास्त्रे, वाणिज्य, व्यवस्थापन आणि शुद्ध विज्ञान या विविध शाखांतील समकालीन विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. शाश्वत विकासासाठी नवोन्मेषी विचारसरणी विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला. विविध तज्ञांनी आपले संशोधन सादर करतांना बदलत्या जागतिक परिस्थितीत शिक्षण आणि संशोधनाची भूमिका अधोरेखित केली. या परिषदेचे आयोजन हजरत बाबा ताजुद्दीन महाविद्यालय आणि अशोक मोहरकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय, मारिया कला आणि विज्ञान महाविद्यालय तसेच उम्मे- सलमा कला आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. समारोप सोहळ्यात उत्कृष्ट संशोधनपत्रांना गौरविण्यात आले. परिषदेमुळे विद्यार्थ्यांना नवीन संधी खुली झाली असून शैक्षणिक क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना सहभागींकडून व्यक्त करण्यात आली.