मतदारांनी आपल्या नावाचे मॅपिंग करून घ्यावे – एसडीओ संजय पवार

0
41

कामठी :- निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता व अचूकता वाढविण्याच्या दृष्टीने आगामी एप्रिल महिन्यापासून कामठी-मौदा विधानसभा मतदार संघातील मतदार यादीचे सखोल पुंननिरीक्षण (एस आय आर)कार्यक्रम राबविन्यात येणार असून या विधानसभा मतदार संघातील मतदारांनी आपल्या मतदार यादीतील तपशील अद्यावत करून घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी कामठी येथील एस आय आर मॅपिंग गृहभेटीत मतदारांना केले.

याप्रसंगी 58 कामठी विधानसभा मतदार संघातील कामठी शहर, गुमथळा आदी ठिकाणी मतदारांच्या घरी गृहभेटी केल्या. याप्रसंगी तहसीलदार गणेश जगदाळे, नायब तहसिलदार मयूर चौधरी , प्रदीप भोकरे आदी उपस्थित होते.हा एस आय आर कार्यक्रम एकूण तीन टप्प्यात पार पडणार आहे.या अंतर्गत प्रत्येक मतदाराने आपल्या नावाचे मॅपिंग मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बी एल ओ) यांच्याकडे करून घेणे आवश्यक आहे.मतदार यादीत अचूक नोंदी राहाव्यात यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा ठरणार असून मतदार यादीत अस्पष्ट किंवा चुकीचे फोटों असलेल्या मतदाराणीबनविन रंगीत फोटो संबधित बीएलओ यांच्याकडे सादर करावे.मतदार यादीतील मयत व्यक्तींची नावे वगळण्यासाठी संबंधीत नागरिकांनी फॉर्म क्रमांक 7 भरून त्यासोबत मृत्यू प्रमानपत्र जोडणे बंधनकारक असल्याचे सांगितले .

अचूक आणि बिनचूक मतदार यादी तयार करणे ही प्रशासनाची जबाबदारी असली तरी त्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.त्यामुळे कामठी विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याशी संपर्क साधून आवश्यक ती कागदपत्रे सादर करत या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा .या सखोल पुंननिरीक्षण मोहिमेमुळे मतदार यादीतील त्रुटी दूर होऊन आगामी निवडणुकीसाठी अधिक पारदर्शक व विश्वासार्ह यादी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.