सचिन चौरसिया, रामटेक २३ :- पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे. एक वृक्ष लावुन जन्मदिवस साजरा करुया वृक्ष मोठा होई पर्यंत त्या वृक्षाचे संगोपन करुया तरच आपल जिवन अमुल्य प्रदुषण मुक्त होईल व शुध्द हवा मिळु शकेल. ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात मिळेल. वृक्षारोपण वृक्षसंवर्धन “एक वृक्ष आरोग्य स्वस्थ” चला आज पासून संकल्प करुया एक वृक्ष लावुन मुख्यमंत्रीचा जन्मदिवस साजरा करुया पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करुया. भारतीय जनता पक्ष रामटेक विधानसभाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त आज एक पेड मा के नाम अभियान राबवुन नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला मनसर ते कन्हान वृक्षरोपण माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचा हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा महामंत्री उदयसिंग यादव, संजय मुलमुले, दिलीप देशमुख, व्यंकट कारेमोरे, राहुल किरपान, बिरेंद्र सिंग, योगेश मात्रे, नंदलाल बावनकुळे, विवेक तोतडे, करीम मालाधारी, उमेश पटले, आलोक मानकर, रजत गजभिये, पप्पू यादव, धर्मेंद्र शुक्ला, बैजू खरे, ज्ञानेश्वर ढोक, सरपंच रणवीर यादव, गांधी रेड्डी, ज्योती कोल्हेपरा, कविता मुलमुले, कांचनलता बंधाटे, उज्ज्वला धमगाये, स्नेहा गावंडे, चित्रा धूरई, शिल्पा रणदिवे सह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



