कामठी २३ : मनुष्याने प्रति दिन भगवान शंकराची पूजा ,आरती, आराधना करून शिव महापुराण कथेचे श्रवण केल्याने यशाचा मार्ग प्राप्त होऊन सर्वांगीण कल्याण होत असल्याचे मत प्रयागराज उत्तरप्रदेश येथील कथावाचक पंडित राजेंद्र सरकार यांनी शिवभक्त समिती कामठीच्या वतीने निंबाजी वस्ताद अखाडा समाज भवन येथे आयोजित शिव महापुराण कथेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले. शिवभक्त समितीच्या वतीने आयोजित शिवमहापुराण कथेची सुरुवात समाजसेवक माजी नगरपरिषद उपाध्यक्ष अजय कदम ,राजेश शर्मा, पप्पू गुप्ता यांचे हस्ते भगवान शंकराच्या प्रतिमेची पूजा ,आरती , आराधना करून करण्यात आले प्रतिदिन दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 27 जुलै रोज रविवारला दुपारी 12 वाजता सुमारास दहीकाला महाप्रसादाने शिवमहापुराण कथेची सांगता होणार आहे आज शिव महापुराण कथेच्या प्रसंगी प्रयागराज उत्तर प्रदेश येथील कथावाचक पंडित राजेंद्र सरकार यांनी शंकर भगवानाची पूजा ,आरती ,आराधना केल्याने मनुष्याच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होऊन उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळत असते प्रतिदिन शिव महापुराण कथेचे श्रवण केल्याने मनुष्याला यशाचा मार्ग प्राप्त होऊन सर्वांगीण कल्याण होत असल्याचे सांगितले शिव महापुराण कथेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन शिवभक्त आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले.
Home Latest News मनुष्याने शिवमहापुराण कथेचे श्रवण केल्याने यशाचा मार्ग प्राप्त होऊन सर्वांगीण कल्याण होतो...


