Thursday, April 9, 2026
spot_imgspot_img
spot_img

मौदा तालुक्यात बारा ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीसाठी 7 एप्रिल पासून 

– नाम निर्देशन पत्र स्वीकाराला सुरुवात, 28 ला मतदान व 29 एप्रिल ला मतमोजणी 

किशोर साहू, मौदा :- मौदा तालुक्यातील राजोली व नांदगाव या दोन ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाकरिता तर खरडा, बानोर, तारसा, आष्टी ( नवेगाव ),बेरडेपार, मारोडी, भांडेवाडी ,चिरव्हा, महालगाव, गोवरी या दहा ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी एक सदस्यासाठी पोटनिवडणूक होणार असल्याचे आज दुपारी दीड वाजता दरम्यान पंचायत विस्तार अधिकारी शरद दोनोडे यांनी भ्रमणध्वनी वरून सांगितले.

7 एप्रिल पासून नामनिर्देशन पत्र स्वीकाराला सुरुवात झाली असून 28 ला मतदान व 29 एप्रिल ला मतमोजणी होणार आहे. ग्रामपंचायत राजोली व नांदगाव येथे पुन्हा जनतेतून सरपंच पदाकरिता पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे. सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व पुढारीवर्ग आपल्याच पक्षाचा सरपंच निवडून येण्यासाठी डावपेच आखायला सुरुवात केलेली आहे, असे राजकीय जाणकार गावातील पानटपऱ्या व चौकामध्ये निवडणुकीसंबंधी चर्चा केल्यानंतर सांगत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com