Sunday, April 12, 2026
spot_imgspot_img
spot_img

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर कांद्री येथे संपन्न

– एकुण ३४५ नागरिकांनी समाधान शिबीराचा लाभ

कन्हान :- पारशिवनी तहसिल अंतर्गत कांद्रीनगर पंचायत येथिल जि प शाळेच्या पटागंणात प्रभारी तहसिलदार अनमोल कांबळे यांच्या प्रमुख उपस्थित छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यात तालुक्यातील सर्व प्रमुख विभागाचे अधिकारी व कर्मचारी हयानी विविध योजने ची नागरिकांना माहिती देत त्यांचे एकुण ३४८ अर्ज दाखल करून घेतले असुन ०३ अर्ज प्रलंबित असल्याने ३४५ नागरिकाना विविध योजनेचा लाभ देऊन समाधान शिबीर संपन्न झाले.

शुक्रवार (दि.१०) एप्रिल २०२६ ला सकाळी ११ .३० वाजता कांद्री नगरपंचायत येथिल जि प शाळेच्या पटागंणात कांद्री नगराध्यक्ष सुतित पानतावने, उपाध्यक्ष धर्मेंद्र सरोदे, बांधकाम सभापती अतुल हजारे, नगर सेवक शिवशंकर चकोले, प्रभारी तहसिलदार अनमोल कांबळे, नायब तहसिलदार मिश्रा, नायब तहसिलदार कुंबरे साहेब, नरहरि पोटभरे, पवन कुंभलकर, नगरसेवक व नगरसेविका आदीच्या प्रमुख उपस्थित छत्रपती शिवाजी महाराज समा धान शिबीरांची विधि वत सुरूवात करण्यात आली. यात पारशिवनी अंतर्गत सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहुन प्रत्येक विभागातील विविध योजनाची नागरिकाना माहिती व मार्गदर्शन करून गट विकास अधिकारी पंचायत समिती पारशिवनी अंतर्गत ४१ अर्ज, कृषी विभागाचे १२, आरोग्य विभागाचे ११ , बाल विकास प्रकल्प ५, संगायो १०, सेतु २१, पुरवठा विभाग १८, मंडळ अधिकारी व तलाठी २३० असे एकुण ३४८ अर्ज दाखल झाले. यातील पुरवठा विभागाचे ०३ अर्ज प्रलंबित राहिल्याने ३४५ नागरिकांना विविध योजनेचा लाभ देण्यात आला. उन्हाचा चांगला तडाखा असल्याने शिबीरास पाहिजे तशी नागरिकांची उपस्थित राहु शकली नाही. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र उबाळे यानी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com