Monday, April 13, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सामाजिक समता सप्ताहाने क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती साजरी

कन्हान :- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या व्दिसताब्दी जयंती निमित्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे अंतर्गत समतादुत प्रकल्प ता. पारशिवनी व्दारे नाराय णा विद्यालय कन्हान येथे सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची व्दिसताब्दी जयंती साजरी करण्यात आली.

शनिवार (दि.११) एप्रिल २०२६ ला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या व्दिसताब्दी जयंती निमि त्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे अंतर्गत समतादुत प्रक ल्प ता. पारशिवनी जि. नागपुर व्दारे श्री नारायणा विद्यालय कन्हान येथे सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करून सर्व प्रथम महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विद्यालयाचे संचालक एन बाबु नानन व प्राचार्या प्रिशा मेघानी यांच्या हस्ते माल्यार्पण आणि संविधान प्रास्ताविकाचे वाचन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. तदंतर वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रंमाक पटकविणारा लक्ष्मण संतोष बोंडे व व्दितीय प्रतिज्ञा यादव या विजेत्या स्पर्धकाना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व संविधान उद्देशिकाची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत सिहोना ईका, प्रतिज्ञा यादव, लक्ष्मण वडे, वंशिका चनकापुरे, समिक्षा ठाकरे,लक्ष्मण संतोष बोंडे, इकरा शेख, तनिषा देवगडे, साक्षरा नानन, वेंदात लोढे, सौरव सुर्यवंशी, निधी पाटील आदी विद्या र्थ्यानी सहभाग घेतला होता. समतादुत शुंभागी टिंगणे (बार्टी) यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्या बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता मुख्याध्यापिका अर्चना यादव, रेखा गरपते, ज्योती शर्मा, मोहसेना रशीद, शिला मेश्राम, जस्मीन शेख, सना अंजुम, प्रणाली बाधमांगे, कविता चिचघरे, राजेंद्र गिरी, आकाश नगराळे, आनिसुर रहमान, अब्दु ल हसन आणि शाळेतील विद्यार्थी आदींनी उपस्थित राहुन सहकार्य केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com