कन्हान :- पिपरी ढिवरपुरा आंगनवाडी क्रमांक १२६ येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित सुनिता मानकर यांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी सुनिता मानकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर उपस्थितांना, विद्यार्थांना मार्गदर्शन केले. उपस्थितांनी डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी कांचन भोयर, दुर्गा भोयर, सीता ऊके, सुनिता मेश्राम, हिम्पल हावरे, निकीता भोयर, पल्लवी मेश्राम, शितल मेश्राम, माधुरी भोयर सह नागरिक उपस्थित होते.



