संविधान, कायदा, कलमाची माहिती देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

0
40

– कलम १४ ते ३२ नागरिकांना समानता, स्वातंत्र्य, शोषणा विरुद्ध हक्क प्रदान करते- अँड. पुजा आडे. 

कन्हान :- शहर विकास मंच द्वारे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन संजीवन नगर कांद्री येथे करण्यात आले.

कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे मार्गदर्शक भरत सावळे, अँड. पुजा आडे, नगरसेवक राकेश लांजेवार यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन आणि बुद्ध वंदना घेऊन केक कापुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी अँड. पुजा आडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करित संविधान कायदा, कलमाची माहिती दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेवर आधारित संविधान दिले. कायद्याचे राज्य, कलम १४ ते ३२ अंतर्गत मूलभुत अधिकार आणि महिला, दलित शोषितांना समान हक्क मिळवुन देण्यात त्यांचे योगदान अमुल्य आहे असे सविस्तर मार्गदर्शन केले. तदंतर महिलांनी भीम गीत सादर केले आणि संविधानाचे वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन शहर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांनी केले. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, मार्गदर्शक भरत सावळे, नारायण गजभिये, ज्ञानेश्वर ऊके, निखिल मेश्राम, माहेर इंचुलकर, निखिल तांडेकर, शुभम बावनकर, प्रमोद गिऱ्हे, विकास सोनवाने, प्रदीप बावने, अर्चना तांडेकर, सुषमा मस्के, जयश्री गडपा डे, मीना गिऱ्हे, रंजना किरपाने, सिध्दार्थ घरडे, बबन नारनवरे, राम पाटील, प्रकाश थोरात, स्वप्नील बेलेकर, सौरभ घरडे, मनिष शंभरकर, वैभव थोरात, माया बेलेकर, कल्पना नाईक, वनिता लांजेवार, स्वीटी पाटील, सुरेखा बोरक र, वनमाला चिमनकर, सुशिला खडसे, अर्चना थोरात, अर्चना नारनवरे,किरण हुमने, गौतमी नारनवरे,प्रमिला घरडे, निरुपा बेलेकर सह नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.