नागपूर :- दिनांक १४ एप्रिल रोजी, नागपूर येथील संविधान चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महान कार्यास व क्रांतिकारी विचारांना विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमात सामाजिक न्याय, समता, बंधुता व संविधानाच्या मूल्यांचे पालन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. डॉ.आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे सर्व नागरिकांना समान अधिकार प्राप्त झाले असून त्यांच्या विचारांचे आजही तितकेच महत्त्व आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किशोर कन्हेरे, श्याम चौधरी, संतोष सिंह, राजेश रंगारी, गजानन चकोले, रिजवान अन्सारी, संजय शेवाळे, विजय शेंडे, रेखा कुपाले, सुरेश गजभिये, मच्छिंद्र आवळे, ज्ञानेश्वर नाडेकर, राधेश्याम राजपूत, अनिकेत रंगारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत प्रेरणादायी असून उपस्थितांनी डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा व समाजात समतेची भावना बळकट करण्याचा संकल्प केला.



