राजधानीत महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त अभिवादन

0
49

नवी दिल्ली :- समाजसुधारक आणि थोर विचारवंत महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आज राजधानीत त्यांना अभिवादन करण्यात आले.

कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे, निवासी उपअभियंता जमुनाप्रसाद गंगवार आणि महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

याप्रसंगी व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी महात्मा महात्मा बसवेश्वरांनी मांडलेले समतावादी विचार, त्यांनी समाजातील जातिभेद नष्ट करण्यासाठी दिलेला लढा आणि लोकशाही मूल्यांच्या रुजवणुकीसाठी दिलेले अतुलनीय योगदानाचा परिचय करून दिला.