नागपूर :- महामानव, भारतरत्न, प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 13 ते 18 एप्रिल या दरम्यान, आयोजन केले होते.17 तारखेला बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम आणि शेवटच्या दिवशी 18 तारखेला भोजनदानाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम मिलिंद बुद्ध विहार समिती व भिम बॉईज नागपूर यांच्या वतीने मिलिंद बुद्ध विहार पटांगण, कानफाडे नगर छत्रपती चौक वर्धा रोड नागपूर येथे शुक्रवारी 17 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता. बुद्ध भीम गीतांच्या आयोजित कार्यक्रमात वाद्यवृंद कलाकार सौरभ किल्लेदार, रवी माळवे, भूषण माळवे, स्वप्निल भोसले, शुभम लोखंडे आणि गायक रोहन बागी, श्रद्धा यादव, नेहा गिरी, आदित्य सवांग या सर्वांच्या गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संचालन अश्मक लांडगे यांनी केले तर संचा ने आभार मानले.



