पांढरकवडा :- स्थानिक मित्र क्रीडा मंडळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मित्र क्रीड़ा मंडळाच्या पटांगणावर २५ एप्रिल ते १० मे पर्यत ग्रीष्मकालीन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या सात दशकांपासुन खो खो, कब्बडी, कुस्तीचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडु तयार करणाऱ्या मित्र क्रीडा मंडळाच्या वतीने यंदा सुध्दा तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने खो खो, कबड्डी, कुस्ती व लाठी-काठीचे ग्रीष्मकालीन शिबिर आयोजीत करण्यात आले आहे. यामध्ये लाठी-काठीचे प्रशिक्षण शिबिर हे फक्त मुली व महिलांकरीताच आयोजीत करण्यात आले आहे. आजच्या धकाथकीच्या जिवनामध्ये आपण मातीच्या खेळापासुन दुर जात आहो.
माती पेक्षा संगणकीय खेळाकडे मुलांचे आकर्षण वाढल्याने अगदी लहान पणापासुनच मुलांना विविध आजार जड़त आहे. प्रत्येक व्यक्तीने जिवनात एक तरी खेळ खेळाला हवा, खेळाच्या माध्यमातुन मुला-मुलीची एकाग्रता वाहुन त्याचा परिणाम त्यांच्या बुध्दीमत्तेवर सुध्दा चांगला होत असतो. त्यामुळे संगणकीय खेळापासुन मुलांना दुर ठेवुन मातीतील खेळाकडे पालकांनी त्यांना वळ्वावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर शिबिर सकाळी ५.३० ते ७ व सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३० पर्यंत राहणार आहे. शिबिरामध्ये भाग घेवू इच्छिणाऱ्यांनी अजय कुमरे, धिरज रेड्डीवार, आशुतोष जाधव, सौरभ बेले, पवन वर्मा, सुविधी कोपुलवार, वर्षा तलमले, समिक्षा मडावी, अनुष्का जाधव आदि सोबत २४ एप्रिल पर्यत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



