Saturday, April 25, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कॉ. राजेंद्र साठे यांनी रज्जु परिपगार यांच्या उपोषण स्थळी भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले

नागपूर :- आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (CITU) नागपूर जिल्हा अध्यक्ष काँग्रेस राजेंद्र साठे यांनी रज्जू परीपगार यांच्या सुरू असलेल्या सहपरिवार आमरण उपोषण स्थळी संविधान चौकात भेट देऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेच्या कर्मचाऱ्यांची दशा, आशा वर्कर यांचे थकीत मानधन व बीएलओच्या कामाचा तकादा या विषयावर सविस्तर चर्चा केली. सोमवार दिनांक – 20 एप्रिल 2026 पासून प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनातील जिल्हा समन्वयक रज्जू परीपगार आपल्या विविध मागण्यांना घेऊन जिल्हा परिषद परिसरात उपोषणावर सहपरिवार बसल्या होत्या. परंतु काल रात्री पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना नागपूरच्या संविधान चौकामध्ये आमरण उपोषण करण्याकरता सोडून दिले. सध्या त्या संविधान चौक येथे सहपरिवार आमरण उपोषण करीत आहेत. प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना मधील प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा समन्वयक व एक सहाय्यक जिल्हा समन्वयक असे दोन कर्मचारी असून संपूर्ण राज्यात 48 कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु वरील योजना महिला व बालविकास विभागाकडे गेल्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत असणारे कर्मचारी यांचे महिला बाल विकास विभागाकडे समायोजन करावे अन्यथा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समकक्ष असलेल्या पदावर नेमणूक करावी अशी मागणी करण्यात येत आहे. यावर वरिष्ठ अधिकारी व मुख्यमंत्री महोदय सह कित्येक मंत्र्यांबरोबर पत्रव्यवहार करून सुद्धा कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही व सात महिन्यापासून थकीत असलेला पगार सुद्धा त्यांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे रज्जू परिपगार सहपरिवार आमरण उपोषणाला बसल्या असून इतर जिल्ह्याचे सहयोगी सुद्धा त्यांचे सोबत सहयोग करीत आहेत. वरील काम कामावर आधारित मोबदल्यानुसार आशा स्वयंसेविका यांच्याकडून करून घेण्यात येत होते परंतु किमान तीन वर्षापासून आशा स्वयंसेविका यांना सुद्धा मोबदला देण्यात आलेला नाही.

1) प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM)अंतर्गत सामावून घ्यावे.

2) प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे 7 महिन्यापासून थकीत असलेले वेतन द्या.

सन्माननीय उच्च न्यायालय नागपूर दिनांक -16-12-2025 च्या अंतिम आदेशानुसार कार्यादेश मिळण्याबाबत.

3) प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचे ऑनलाइन पोर्टल लाभार्थी नोंदणीचे काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका यांचा तीन वर्षापासून थकीत असलेला कामाचा मोबदला द्या

4) आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे सप्टेंबर 2025 पासून थकीत असलेले केंद्राचे मानधन व इतर कामाचा मोबदला त्वरीत द्या.

5) आशा वर्कर यांच्यावर करण्यात येणारी BLO कामाची सक्ती बंद करा.

6) आशा वर्कर यांना BLO चे काम देताना त्यांच्या कार्यक्षेत्रातच काम द्या व त्या कालावधीतील मानधन कपात न करता त्यांना पूर्ण मानधन द्या.

वरील विषयावर तात्काळ तोडगा काढा अन्यथा सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका व इतर कंत्राटी कर्मचारी रज्जु परीपगार यांच्या आमरण उपोषण स्थळी भेट देतील अशी माहिती कॉम्रेड राजेंद्र साठे यांनी एका पत्रकातून दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.