Monday, April 27, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत ग्रा पं राजोली मध्ये निवडणुकीसारखी चुरस, तर ग्रा पं नांदगाव मध्ये काका पुतण्याची सरळ लढत शांततेत

किशोर साहू, मौदा :- मौदा तालुक्यातील राजोली व नांदगाव या दोन ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाकरिता पोटनिवडणूक 28 एप्रिल ला होणार आहे. ग्रा पं राजोली येथे उपसरपंच तथा प्रभारी सरपंच योगेश महादुले (सिलेंडर), मागच्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभूत झालेले ग्रामपंचायत सदस्याचे उमेदवार मधुकर श्रावणकर (छत्री), पोट निवडणुकीपूर्वीच भावी सरपंच म्हणून गावात चर्चेत असलेले युवा रवी पोटभरे (ट्रॅक्टर), ग्रा पं सदस्य रूपचंद आंबिलढूके( कपबशी) असे चार उमेदवार रिंगणात असून, चुनाव चिन्ह कपबशी चे उमेदवार वगळता सिलेंडर ,छत्री व ट्रॅक्टर चुनाव चिन्ह असलेले उमेदवार ट्रॅक्टर वर माइक लावून ऑडिओ क्लिप द्वारे निवडणुकीसारखेच प्रचार करताना वृत्तपत्र वाटप करीत असताना दिसत आहेत व या तीनच उमेदवारांनी गावात व राजोलीटोली येथे मोठ्या प्रमाणात मोठमोठे बॅनर लावून निवडणुकीत चुरस निर्माण केल्याचे दिसत आहेत.

तर ग्रा पं नांदगाव येथे सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य काका बेनीराम पडोळे (ट्रॅक्टर), मागच्या सलग दोन सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्याचे उमेदवार म्हणून पराभूत झालेले पुतण्या दीपक पडोळे(कपाट) गावात दोन-तीन ठिकाणी साधे बॅनर लावून(रविवार 26 एप्रिल पर्यंत)सरपंच पदाकरिता पोटनिवडणूक शांततेत पार पाडत आहेत. गाव नात्याने पुतण्या दीपक पडोळे काका बेनीराम पडोळे यांना निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजयी होण्यापासून रोखतात की काका पुतण्याला या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत पराभूत करून पुतण्याची निवडणुकीत पराभवाची हॅट्रिक करतात हे येत्या 29 एप्रिल ला निवडणूक निकालाच्या दिवशी कळणार आहे. महाराष्ट्रात काका पुतण्याचे राजकारण नेहमी चर्चेत असल्याने, ग्रामपंचायत नांदगाव येथे लढत जरी शांततेत असली तरी लढत काका – पुतण्यात असल्याने या काका – पुतण्याच्या लढतीकडे गाव, परिसर व संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे, हे विशेष!


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.