– कन्हान पोलीसानी पिडीत महिलेच्या तक्रारीवरून आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला.
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत बोरडा (गणेशी) येथिल शेतात ३३ वर्षिय महिला शेतातील घराचे काम पाहणी करित असताना शेतात काम करणारा मजुर अरूण तडस यांनी महिलेशी अश्लिल चाळे केल्याच्या तक्रारीवरून कन्हान पोस्टे ला आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील सखोल तपास करित आहे.
शुक्रवार (दि.१) मे ला दुपारी बोरडा (गणेशी) येथिल घटस्फोटित ३३ वर्षीय महिला ही आपल्या वडिलाच्या शेतात घर कामाची पाहणी करित असता ना शेतात आठ दिवसा पासुन काम करणारा मजुर अरूण तडस वय ४७ वर्ष रा. निमखेडा हा ३ वाजता कामावर आला. आणि अंदाजे दुपारी ३.३० वा. दरम्यान कालम चे काम सुरु असतांना महिला प्लास्टीक ड्रामवर बसुन कालम च्या पाटीला हात पकडुन बसली असता अरुण तडस यांनी माडीवर हात लावल्याने ती ड्रामचे खाली उतरत असताना त्यांने सामोरुन तिचा हात ओढुन मागुन चेस्ट ला हात लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा जोरात आरडा ओरडा केली. तेव्हा तो म्हणाला कि, दोन मिनटाचे काम आहे, असे बोलुन तिचा हात पकडला असता तिने हात झटकुन माझे वडिलांना सांगणार असे म्हटल्याने तो घाबरुन गेला व ती तेथुन निघुन गेली. त्यांने मला लज्जा निर्माण व्हावी असे कृत्य केल्याने सदर प्रकरण तिने घराचे लोकांना सागितले. परंतु तिची प्रकृती बरोबर नसल्याने महिले नी दुस-या दिवसी (दि.३) मे ला आरोपी विरूध्द तक्रार केल्याने पोलीस निरिक्षक वैजयंती मंडवधरे यांचे मार्ग दर्शनात कन्हान पोलीसानी आरोपी अरूण तडस विरू ध्द कलम ७४, ७५ (१), ७५(२) भा.न्या.स २०२३ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील सखोल तपास कन्हान पोलीस करित आहे.