spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कन्हान मध्ये पाणीटंचाई चा प्रश्न टोकावर; वेकोलि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

– नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे च्या नेतृत्वात शिष्ठमंडळाचे पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन. 

कन्हान :- नगरपरिषद कन्हान-पिपरी क्षेत्रात वेकोलि अधिकाऱ्यांचा निष्क्रियतेमुळे उद्भवलेला पाणी टंचाई चा प्रश्न टोकावर पोहचला आहे. नगरपरिषद चे नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांच्या नेतृत्वात शिष्ठमंडळाने पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांची भेट घेत या गंभीर विषयावर चर्चा करुन वेकोलि संबधित अधिका ऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदन पत्र देऊन करण्यात आली आहे.

नगरपरिषद कन्हान-पिपरी क्षेत्रातील स्वामी विवेकानंद नगर येथील हिराबाई शाळे जवळ पाण्याची टाकी येथे वेकोलि चे सीएसआर निधीतुन वर्ष २०१४ -१५ मध्ये पिण्याचे पाण्याची व्यवस्थेसाठी पाणी फिल्टर व तत्सम योजना तयार करून देण्यात आली होती. परंतु मागील दोन ते तीन वर्षांपासुन सदर योजना नादुरुस्त असुन बंद अवस्थेत पडली आहे. सोबतच उन्हाळा ऋतु सुरू असल्याने पाण्याचा त्रास हा स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे.

या संदर्भात वेकोलि अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार, पत्रव्यवहार व क्षेत्र भेट देऊन ही वेकोलि मार्फत कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही आहे. फिल्टर प्लांट मध्ये पाणी पुरवठा करण्याची संपूर्ण जबाबदारी ही वेकोलि अधि काऱ्यांची असुन टाळाटाळीचे उत्तरे देत आहे. वेकोलि अधिकाऱ्यांचा निष्क्रियतेमुळे शहरात भीषण पाणी टंचाईची समस्या उद्भवलेल्याने नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे , उपाध्यक्ष रिकेंश चवरे आणि सर्व नगरसेवक, नगरसे विका यांनी पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांची भेट घेत चर्चा करून एक निवेदन पत्र देऊन वेकोलि च्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

याप्रसंगी नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे, उपाध्यक्ष रिकेंश चवरे, नगरसेवक केतन भिवगडे, शिवशंकर वाकुडकर, मनोज कुरडकर, विनोद किरपान, प्रशांत पाटील, शक्ती पात्रे, महेंद्र साबरे, मयुर माटे, नगरसेवि का योगिता भेलावे, सुषमा चोपकर, पुनम राठी, सुनंदा दिवटे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.