नागपूर :- पवनशक्ती नगर, वाठोडा ले आउट येथील स्वराज पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नागपूर ने या वर्षी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असुन अनेक विद्यार्थी 90% घेऊन अधिकाधिक उत्तीर्ण झाले, विद्यार्थ्यांमध्ये रोहित गंगाधर कावळे 96.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
त्या पाठोपाठ कनिष्क शेंडे 91 टक्के (युक्ती निंबाळकर 90.80) (हिमांशू मुनेश्वर 89.80) (किंजल खोब्रागडे 88%) (सोनाली पाटील 86.80) (आयेशा अन्सारी 85.80) या सर्व विद्यार्थ्यांनी प्राविण्य गुण मिळविले. या यशाबद्दल शाळेचे संचालक प्रा. सचिन काळबांडे, स्मिता काळबांडे, मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संचालक प्रा. सचिन काळबांडे यांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे कौतुक करतांना सांगितले की, शिस्त आणि सातत्यपूर्ण अभ्यासामुळे शिक्षकांनी विशेष लक्ष दिल्याने हे घवघवीत यश मिळाले आहे. याप्रसंगी फैजान पटेल, अमित महतो, करिष्मा झाडे, राधिका दाभाडे, भाविका बांते, अरविंद रामटेके या शिक्षकांचे मुलाचे सहकार्य लाभले.