– मोठा अपघात झाल्यावरच रेल्वे प्रशासन जागे होईल का ?
– खासदार बर्वे हयाना निवेदन देऊन तात्काळ रेल्वे उडाण पुल रस्त्या दुरूस्तीची मागणी
कन्हान :- केरडी रेल्वे उडाण पुल रस्त्यावरचे डांबरी करण उखडुन मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातास निमंत्रण देत असल्याने एका वर्षा पासुन केरडी ग्राम पंचायत व नागरिकांनी वांरवार दुरूस्तीची मागणी करून सुध्दा रेल्वे अधिकारी तसेच संबधित अधिकारी जाणिव पुर्वक दुर्लक्ष करित असल्याने या पुल व रस्त्याची अत्यंत दैनावस्था होऊन मोठया अपघाताची शक्य ता नाकारता येत नसल्याने केरडी रेल्वे उडाण पुल व रस्त्याची तात्काळ दुरूस्ती, डांबरीकरण व पथदिवे लावण्याची केरडी व परिरातील नागरिकांनी खासदार बर्वे हयाना निवेदन देऊन मागणी केली आहे.
नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरून केरडी गावाकडे जाणा-या रस्त्यात रेल्वे उडाण पुल असुन पुलाच्या मुख्य भिंतीला आणि रडारला मोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे पुलाच्या बांधकामावर प्रश्न निर्माण होऊन कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलावरील डांबरी रस्ता पूर्णपणे उखडला असुन मोठ मोठे जीवघेणे खड्डे अपघातास निमंत्रण देत आहेत. हे खड्डे वाचवण्याच्या नादात वाहनचालक चुकीच्या दिशेने वाहन चालवितात ज्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात होते.![]()
पुलावर पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी संपुर्ण परिसरात काळोख असल्याने पादचारी, शालेय विद्यार्थी आणि महिलांना ये-जा करताना भीती वाटते. तसेच या अंधा राचा फायदा घेऊन लूटमारीच्या घटना वाढु सकतात. गेल्या एका वर्षापासुन येथील नागरिक आणि केरडी ग्राम पंचायत चे सरपंच पिंटु खंडार यानी सातत्याने रेल्वे विभाग व संबंधित अधिकाऱ्यांकडे वांरवार निवेदन देऊन हा रस्ता दुरूस्तीची मागणी करित आहेत,मात्र रेल्वे प्रशासन आणि संब़धित विभाग जाणिव पुर्वक दुर्लक्ष करित असल्याने या रेल्वे उडाण पुल रस्त्याची अवस्था अत्यंत दैयनिय झाली आहे.
केरडी रेल्वे उडाण पुल रस्त्यावरून केरडी,तेलन खेडी, साटक, बनपुरी, नगरधन मार्गे रामटेक ग्रामस्था ची नेहमी ये-जा सुरू असल्याने नागरिकांनी क्षेत्राचे खासदार मा. श्यामकुमार बर्वे यांची भेट घेऊन या गंभीर समस्येची दखल घेऊन रेल्वे अधिकारी आणि संबधित विभागाच्या अधिका-याना केरडी रेल्वे उडाण पुल व रस्त्याची तात्काळ दुरूस्ती, डांबरीकरण व पथदिवे लावण्याचे आदेश द्यावेत. जेणे करून मोठा अनर्थ होण्या पुर्वी संबधित प्रशासनाच्या अधिका-यांना जाग येणे आवश्यक आहे. आपल्या माध्यमातुन तरी तात्काळ केरडी रेल्वे उडाण पुल रस्त्याची समस्या सोडविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता राहुल वानखेडे, रामु लाडगे, ठाकरे, सतिश घराड, प्रशांत बाजीराव मसार, अशोक राऊत, गौरव धोटे, आयुष मेंघर सह केरडी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.