spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हस्तलिखित वारसांच्या जतन, संवर्धनासाठी ‘ज्ञान भारतम् अभियान

– हस्तलिखितांची डिजिटल नोंद करता येणार !

– ‘ज्ञान भारतम् पोर्टल, ॲपवर हस्तलिखितांची नोंदणी करण्याचे आवाहन

यवतमाळ :- केंद्र सरकारच्यावतीने देशभरात ‘ज्ञान भारतम्’ प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान सुरू करण्यात आले असून, भारताच्या समृद्ध हस्तलिखित वारसाचे जतन, संवर्धन आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी हा महत्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रम आहे.

पुराभिलेख संचालनालय, यांनी दिलेल्या ‘ज्ञान भारतम्’ तसेच संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांनी उपलब्ध करून दिलेल्या वापरकर्ता मार्गदर्शकनुसार देवस्थान, न्यास व संस्थांकडे उपलब्ध असलेल्या हस्तलिखितांची माहिती ‘ज्ञान भारतम्’ मोबाईल अॅपमध्ये नोंदविण्याच्या सूचना संबंधित विश्वस्तांना देण्यात आल्या आहेत.

तसेच ‘ज्ञान भारतम्’ पोर्टलवर नमूद केल्याप्रमाणे ऐतिहासिक व धार्मिक स्वरूपाचे प्राचीन साहित्य, जसे हस्तलिखिते, पोथ्या, पुराणे आणि तत्सम साहित्याची डिजिटल स्वरूपात नोंद संबंधित देवस्थान, न्यास व संस्थांनी पोर्टलवर करावयाची आहे.

धार्मिक स्थळांचे विश्वस्त, संस्था, मठ, मंदिरे तसेच वाचनालय तसेच हस्तलिखितांचे जतन करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी उपलब्ध हस्तलिखितांची माहिती ‘ज्ञान भारतम्’ पोर्टल अथवा मोबाईल अॅपवर नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या साहित्याचे जतन, संवर्धन व संरक्षण होण्यासाठी संबंधित विश्वस्तांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. पोर्टलवर नोंदणी करताना कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवल्यास संबंधित साहित्याच्या माहितीसह सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, यवतमाळ येथे संपर्क साधावा, जेणेकरून साहित्याची योग्य प्रकारे नोंद घेता येईल, असे आवाहन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे सहायक धर्मादाय आयुक्त प्र.भु.तौर, यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.