spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

घोरपड येथे हवामान आधारित तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाचे नियोजन

कामठी :- महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय मार्फत हवामान आधारित तंत्रज्ञान खरीप हंगामामध्ये राबविण्याकरिता शेतकऱ्यांना हवामानाचा होणारा परिणाम लक्षात घेऊन आपले पीक कसे वाचवावे कमी खर्चात कशी शेती करावी व शाश्वत शेती कशी करावी त्याबाबत घोरपड गावात विविध तंत्रज्ञाचे मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम गज्जू यादव यांचे शेतात इंद्रपाल बागडे उप कृषी अधिकारी कामठी यांनी जीवामृत कसे करावे. याबद्दल मार्गदर्शन करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. कविता ढोके उप कृषि अधिकारी कामठी यांनी शेतकऱ्यांना बिजामृत कसे करावे तसेच घन जीवामृत बाबत मनोज यादव सहाय्यक कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमांमध्ये सुनील उज्जैनवार सहाय्यक कृषी अधिकारी अजनी यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमात कुणाल कडू, ज्ञानसिंग यादव, मनोहर तिडके, रामचंद्र मेश्राम, राधेश्याम घाडगे, दत्तू ठाकरे, लीलाधर धरमारे, वीरेंद्र यादव, नरेंद्र धनजोडे, रमेश कडू यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच इतर गावकरी सुद्धा उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.