spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोर्शी येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर धडकला मोर्चा ! 

– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आक्रमक भूमिका : लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित ! 

– डोंगर यावली सब स्टेशनचा प्रश्न निघाला निकाली ! 

मोर्शी :- मोर्शी शहरामध्ये मागील अनेक महिन्यांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील कॉलनी परिसरासह अनेक भागांमध्ये सतत विजेचा लपंडाव सुरू असल्याने व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच मोर्शी तालुक्यातील डोंगर यावली, हिवरखेड, दापोरी, घोडदेव व सालबर्डी परिसरातील गंभीर वीज समस्यांविरोधात आज महावितरण कंपनीवर नागरिकांचा संताप उसळला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षण सभापती अंकुश घारड व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता कार्यालय, मोर्शी येथे धडक मोर्चा काढण्यात आला त्यावेळी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे महावितरण कार्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील सिंगल फेज वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मंजूर करून आणलेले डोंगर यावली येथे सब स्टेशन फिडरचे रखडलेले काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी तसेच हिवरखेड-दापोरी कृषी फिडर लाईनवरील अपूर्ण दुरुस्ती व दापोरी गावठाण फिडरवरील विस्कळीत वीजपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

याशिवाय , “शेतकऱ्यांना न्याय द्या”, “महावितरण प्रशासन जागे व्हा” अशा जोरदार घोषणा देत प्रशासनाचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी कार्यकारी अभियंता यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून डोंगर यावली येथील सब स्टेशनचे काम तत्काळ पूर्ण करून मोर्शी शहरील व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धडक मोर्चाची दखल घेऊन कार्यकारी अभियंता यांनी डोंगर यावली येथील सब स्टेशनचे काम २० दिवसात सुरू करून नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले व मोर्शी शहरासह तालुक्यातील विजेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्काळ उपाय योजना करून वीज ग्राहकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले त्यावेळी दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षण सभापती अंकुश घारड तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी कार्यकारी अभियंता यांना दिला.

यावेळी धडक मोर्चामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा शिक्षण सभापती अंकुश घारड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष रुपेश वाळके, शेतकरी संजय पांडव, विनोद ठोके, अशोक राऊत, मंगेश चवळे, स्वप्नील निंबोरकर, प्रवीण रामटेके, धनंजय अमदारे, मयूर ढवळी, मनीष गुडधे, गजानन वानखडे, शेखर विघे, सूरज महल्ले, धीरज महल्ले, सागर चौधरी, गौरव सोनारे, शुभम मिश्रा, अन्वर खान, अमोल ठोके, सौरभ काळे, आयुष लांडे, राज माकोडे, चेतन माकोडे, कुणाल म्हाला, सौरभ बारमासे, संकेत बारमासे, अनुप केवतकर, परिमल माकोडे, सुदेश हटवार, गिरीश मानेकर यांच्यासह दापोरी, डोंगर यावली, घोडदेव, सालबर्डी हिवरखेड तसेच मोर्शी शहरातील नागरिक, शेतकरी व युवक मोठ्या संख्येने सहभागी होते.

Popular Articles