नागपूर :- राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचे राष्ट्रीय संघटक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राकेश राजू भलावी यांनी आज पत्रकार परिषदेत गैर अर्जदार (महाठक) डॉ. किरण मिलिंद जाधव – बोरीवली पश्चिम मुंबई यांनी राष्ट्रीय गोंडवाना पार्टीच्या उपाध्यक्ष पदाचा गैरवापर करून नारायणा कंपनीतील ठेकेदार जुगल प्रधान यांच्याकडून तीन ते चार लक्ष रुपयाची खंडणी वसूल केल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये लावला !
किरण जाधव हा महाठक शिवसेना वाहतूक सेनेमध्ये उपाध्यक्ष सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिशाभूल केली आणि राजकीय नेत्यांच्या नावाचा उपयोग करून शासकीय अधिकारी व्यापारी यांना घालतो गंडा सांगतो बँकेत माझी ओळख असल्याची बतावणी करून मोठे रकमेचे कर्ज मंजूर करून देण्याची हमी घेऊन पैसा घेऊन येतो आणि रफूचक्कर होतो अशातला हा किरण जाधव फसवणूक करतो. डॉ. किरण मिलींद जाधव बोरीवली पश्चिम मुंबई यापासून जनतेने सावध राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले. डॉ. किरण जाधव ने मोठ मोठे कारणामे करून सर्वांची फसवणूक केली आणि आताही करत आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा शिवसेना वाहतूक सेना महाराष्ट्राचा उपाध्यक्ष असल्याची माहिती सांगून आणि शिंदे यांच्या अगदी जवळचा कार्यकर्ता सांगून लोकांना हमखास काम करून देण्याची हमी देतो. अशा व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा पत्रकार परिषदेत केली आहे.
मी राकेश राजू भलावी राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सर्व जनतेला सांगू इच्छितो की, डॉ. किरण मिलिंद जाधव हा महाठक माझ्या पार्टीत उपाध्यक्ष पदावर असताना माझ्या वतीने बुटीबोरी येथील नारायण कंपनीकडून दोन बालकामगारांना सोडविण्यात आले होते. त्या कारवाईत 9 डिसेंबर 2025 रोजी डॉ. किरण जाधव यांनी राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचा उपाध्यक्ष म्हणून पोलीस स्टेशन बुटीबोरी येथे माझ्यासोबत आला व कंपनी स्थानावर जाऊन ठेकेदाराचे संपर्क घेऊन त्यांना सांगून तक्रार मागे घेण्यात सांगतो. असे बोलून राहुल लक्ष्मण पगारे यांच्या फोन पे द्वारे किरण मिलिंद जाधव यांच्या फोन पे वरील आणि रोख रक्कमसह तीन ते चार लक्ष रुपये घेतले. अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली.यावेळी भाई राहुल लांजेवार, रामप्रसाद बुरले, शुभम परतेकी, राहुल क्षिरसागर, प्रवीण उईके, प्रशिक गाडगे यांची उपस्थिती होती.