किशोर साहू, मौदा :- इजनी येथील प्रगतिशील शेतकरी, खात – रेवराल जिल्हा परिषद सर्कलचे शिवसेना प्रमुख श्रीहरी थोटे यांनी आपल्या शेतात उन्हाळ्यात आधुनिक पद्धतीने कारल्याची लागवड केली आहे. तालुक्यातील काही मोजकेच मोटारपंप व ओलीताचे साधन असलेले शेतकरी उन्हाळ्यात भेंडी व इतर भाजीपाल्याची लागवड करीत असतात.उन्हाळ्यात तालुक्यातील सर्वच शेतकरी आधुनिक व साध्या पद्धतीने शेती करत नसल्याने शेतीची कामे बंद राहत असल्याने अनेक महिला व पुरुष मजुरांना रोजगाराची समस्या निर्माण होत असते.
मात्र जे शेतकरी उन्हाळ्यात आधुनिक पद्धतीने किंवा साध्या पद्धतीने भाजीपाल्याची लागवड करतात त्यामुळे त्या परिसरातील पुरुष व महिला मजुरांना सकाळ व सायंकाळला रोजगार उन्हाळ्यातही उपलब्ध होत असते, हे विशेष!