नागपूर :- अखिल भारतीय मराठा महासंघ, नागपूर विभागातर्फे मराठा समाजातील लग्नाळू मुलामुलींचा वधू-वर परिचय मेळावा रविवारी 31 मे रोजी, सकाळी 10.30 वाजता. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, सक्करदरा चौक नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. अनेक वर्षे मराठा समाजातील मुला- मुलींची विवाह जुळवणीचे कार्य करणारे स्व.शरदराव भोसले व स्व.सतीशजी गिरमकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टचे अध्यक्ष तथा नागपूर संस्थापक भोसले राजघराण्याचे श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम पार पडणार असून, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार, विरान डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर व मविप्र समाजाचे माजी कार्याध्यक्ष दिलीपराव चव्हाण आणि नवनिर्वाचित नगरसेवक सचिन नाईक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नागपूर विभाग मराठा महासंघाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार तयार करण्यात आलेल्या कमी किंमतीतील वधू-वर परिचय पुस्तिकेचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात येणार आहे. तसेच मंचावर येऊन धाडसाने स्वतःचा परिचय देणाऱ्या लग्नाळू मुलामुलींना ‘शौर्य पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा परिचय मेळावा पूर्णतः निःशुल्क असून मराठा समाजातील पालक, युवक- युवती व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा महासंघाचे नागपूर विभागीय अध्यक्ष व मुख्य संयोजक नरेंद्र मोहिते यांनी केले आहे.



