spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कृषी विज्ञान केंद्र साकोलीद्वारे खेत बचाव अभियानाची अंमलबजावणी 

हंसराज,भंडारा :- ०१ जुन ते ३० जून या कालावधी दरम्यान संपूर्ण भारतात “ खेत बचाव अभियानाची” सुरुवात झाली आहे. कृषी विज्ञान केंद्र साकोली द्वारे सुद्धा भंडारा जिल्ह्यातील निवडक गावांमध्ये या अभियानाची सुरवात केली आहे. कृषी विज्ञान केंद्र साकोली (KVK-भंडारा) , कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था (ATMA) व 0 या अभियानामध्ये अल-निनोचा प्रभाव व त्यावरील सांभाव्य बाबीवर मार्गदर्शन, कृषी विदयापीठाच्या शिफारशी व नविन वाण याबाबत मार्गदर्शन, रासायनिक खताच्या संतूलीत वापराबाबत माहिती, यावर्षी येणा-या पर्जन्यमानाचे अनुमान व त्यानुसार लागवड करावयाच्या कमी कालावधीच्या पिकाची लागवड , रासायनिक खताऐवजी जैविक खतांचा वापर, जयवंत, अझोला, नेपिअर आणि इतर चारा पिकांची माहिती, वातावरण बदलामध्ये अधिक धान उत्पादनासाठी पेरीवविषयी महिती, पेरीव धान पध्दत व पेरणी करताना घ्यावयाची काळजी, राईस ग्रेन प्लांटर, पावर वीडर, भात रोवणी यंत्र आणि इतर औजारे बाबत माहिती दिली जात आहे.

तसेच या अभियानामध्ये जैविक उत्पादने, पेरीव धानाची यंत्राने पेरणी, बीजप्रक्रिया, बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, माती परीक्षण, माती आरोग्य पत्रिका वाचनाचे प्रात्याक्षिके उपस्थित शेतकरी यांच्याकडून प्रत्यक्षरित्या सुध्या करून घेण्यात येत आहे. तरी खेत बचाव अभियानाचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवहन डॉ. उषा डोंगरवार यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.