spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

दीक्षाभूमी दक्षता समितीचे पोलीस आयुक्तांना निवेदन

– बेकायदेशीर कारवायांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी 

नागपूर :- दीक्षाभूमी दक्षता समितीच्या वतीने दिनांक 29 जून रोजी पोलीस आयुक्तांना निवेदन देत दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्याविरोधात कथित बदनामी, खोटा प्रचार, व्यवस्थापनात बेकायदेशीर हस्तक्षेप व मारहाणीचा प्रयत्न केल्याचा आरोप करत संबंधित व्यक्तींवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राजेंद्र गवई, विलास गजघाटे, प्रदीप आगलावे व भंते नाग दीपंकर यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली असून, या प्रकरणामुळे बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्षा मायाताई उके आणि किशोर गेडाम व यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.