spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

नागपूर :- अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ, अमरनगरच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष देविदास आगरकर, सचिव वसंतराव इझनकर व कार्यकारी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली मंडळातील ज्येष्ठ सदस्यांचा वाढदिवस सोहळा मंगळवारी हनुमान मंदिर सभागृह, अमरनगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी लक्ष्मणराव कोहळे, अरुण कोहाड, गोपाल सोरते, रामदास गौरखेडे, तेजराम कातुलवार, भाऊदास नागपुरे, राजेश्वर डगवार आणि प्रकाशराव ढोले यांचा वाढदिवस साजरा करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गणपतराव निंबाळकर, धनराज भोयर, रमेश जिल्हारे, ॲड. अरमरकर, रामेश्वर कांबळे, रामकृष्ण बांगडे, कोहाड, डॉ. राजेश कुऱ्हाडे, शोभा आगरकर, दत्तात्रय उदापुरे, सरिता धनजोड, जया रासेकर, मालती गौरखेडे आणि रेखा काठीकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास गौरखेडे, भोयर, ज्योती निंबाळकर, शेषराव ठाकरे, देवानंद दुधे, गौतम वरघट, धनराज भोयर, प्रकाश गोजे तसेच मंडळाचे अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles