spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पदोन्नती प्रक्रियेत अन्याय झाल्याचा प्रदीप बारापात्रे यांचा आरोप; शासनाकडे न्यायाची मागणी, पत्रकार परिषदेत धाव

नागपूर :- सेवानिवृत्त तलाठी व पदावनत मंडळ अधिकारी प्रदीप जयदेव बारापात्रे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन पदोन्नती प्रक्रियेत आपल्यावर अन्याय झाल्याचा गंभीर आरोप केला. शासनातील काही अधिकाऱ्यांनी चुकीचे अहवाल, दिशाभूल करणारी माहिती व नियमबाह्य कार्यवाही करून आपल्याला पदोन्नतीपासून वंचित ठेवल्याचा दावा त्यांनी केला. बारापात्रे यांनी सांगितले की, आपण याप्रकरणी शासन, जिल्हाधिकारी व महसूल विभागाकडे वारंवार तक्रारी, अर्ज आणि पुरावे सादर केले आहेत. मात्र, त्यावर योग्य निर्णय न घेता चुकीची माहिती पुढे करून अन्याय कायम ठेवण्यात आला. यामुळे आर्थिक व मानसिक नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले.

पदोन्नती प्रक्रियेची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, पदावनतीचा आदेश रद्द करून न्याय द्यावा तसेच झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी बारापात्रे यांनी पत्रपरिषदेत केली. शासनाने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून न्याय द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Popular Articles