spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

लाड-पागे समितीच्या शिफारशींबाबत शासनाकडून मार्गदर्शन घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश

चंद्रपूर :-  दिनांक 04/07/2026 रोजी चंद्रपूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशीप्रमाणे सफाई कुली/सफाई रेजा पदावर नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी दिनांक २२ जून, २०२६ पासून सुरू असलेला बेमुदत संप व आमरण उपोषण महापौर यांच्या सकारात्मक पुढाकारामुळे अखेर मागे घेण्यात आला.

या गंभीर विषयावर तोडगा काढण्यासाठी महापौर यांचे कक्षात महापौर यांच्या अध्यक्षतेखाली उपोषणकर्त्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस आमदार सुधाकर अडबाले (शिक्षक पदवीधर मतदारसंघ), आयुक्त अकुनुरी नरेश, सभागृह नेत्या जयश्री जुमडे, उपायुक्त शेषराव टाले, नगरसेवक प्रदीप देशमुख, सुनिल खंडेलवाल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत लाड-पागे समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत उपस्थित शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच, या विषयावर शासनाकडून आवश्यक मार्गदर्शन तातडीने मागवून त्यानुसार पुढील कार्यवाही विलंब न करता करण्याचे निर्देश महापौर यांनी प्रशासनाला दिले.

महापौर यांनी उपोषणकर्त्यांना विश्वास दिला की, सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही आणि शासनाच्या नियमांनुसार न्याय्य निर्णय होण्यासाठी महानगरपालिका प्रशासन आवश्यक ती कार्यवाही करेल. या सकारात्मक भूमिकेवर विश्वास व्यक्त करत २२ जून, २०२६ पासून सुरू असलेला बेमुदत संप व आमरण उपोषण उपोषणकर्त्यांनी मागे घेण्याची घोषणा केली.

यावेळी उपोषणकर्त्यांनी महापौर यांच्या संवेदनशील व सकारात्मक भूमिकेबद्दल तसेच उपस्थित लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

महापौर यांच्या मध्यस्थीमुळे संवादाच्या माध्यमातून हा महत्त्वाचा प्रश्न सकारात्मक मार्गाने पुढे सरकला असून, शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त होताच पुढील आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.