भगवंतराव बनसिंगे उद्यान पंडित पुरस्काराने सन्मानित

0
31

खापा, वार्ताहर :- सावनेर तालुक्यातील कोच्छी येथील प्रगतिशील शेतकरी भगवंतराव बनसिंगे यांना राज्य सरकारचा २०२४ या वर्षासाठी नागपूर विभागातून उद्यान पंडित हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मुंबई येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बनसिंगे यांनी शेतीत राबविलेले नवनवीन प्रयोग, शेतीला जोड धंदाची जोड देऊन आणि रासायनिक खते न वापरता खर्चात मोठी बचत केली आहे. त्यांनी २०२१ मध्ये जैविक निविष्ठांचा वापर करून आपली शेती फुलवली आहे. या पुरस्काराबद्दल तालुका कृषी अधिकारी सोमनाथ साठे, कृषी अधिकारी युवराज पवार, खापा मंडळ कृषी अधिकारी विलास पिसे आणि कृषी सहायक कृष्णा धोटे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.