spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महापौरांच्या हस्ते ‘शहर आपत्ती व्यवस्थापन आराखडा २०२६-२७’ चे विमोचन

नागपूर :- मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘शहर आपत्ती व्यवस्थापन आराखडा २०२६-२७’ या पुस्तकाचे आज (ता.८) महापौर कक्षात महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

यावेळी उपमहापौर लिला हाथीबेड, सत्ता पक्ष नेता  नरेंद्र(बाल्या) बोरकर, अग्निशमन विशेष समितीच्या सभापती रुपाली ठाकूर, परिवहन सभापती मंगला खेकरे, नगरसेवक विजय( पिंटू) झलके, लखन येरवार, मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बारहाते ,उप. अग्निशमन अधिकारी सुनील डोकरे, देवानंद शामकुळे, सुरेश किनेकर, दिलीप चव्हाण, रुपेश मानके, प्रमुख अग्निशमन विमोचक भरत पालवे, वरिष्ठ लिपिक अरुण भोपे यांच्यासह इतर उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने अग्निशमन विभागाने हा सविस्तर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यामध्ये नागपूर शहराची माहिती, अतिवृष्टीमुळे धोका निर्माण होणारी ठिकाणे, पाणी साचणारे व पाणी शिरणारे भाग, झोपडपट्ट्यांची माहिती, अग्निशमन केंद्रनिहाय संवेदनशील स्थळे, घटना प्रतिसाद प्रणाली (IRS), विविध विभागांचे कर्तव्य व दायित्व, प्रमाणित कार्यपद्धती (SOP), मागील वर्षातील घटनांचा आढावा, उपलब्ध यंत्रसामग्री, वाहने, मनुष्यबळ, झोननिहाय नियोजन, महत्त्वाच्या संपर्क क्रमांकांसह जनजागृतीपर माहितीचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच उष्माघात, अतिवृष्टी, वीज पडणे, सर्पदंश, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्ती बाबत नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी आणि आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक संपर्क व्यवस्था याबाबतही या पुस्तकात मार्गदर्शन करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी पूर्वतयारी, त्वरित प्रतिसाद आणि प्रभावी समन्वय यावर भर देत नागपूर महानगरपालिका यंदाही मान्सून काळात सज्ज आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.