spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मौजा वाठोडा येथील प्रधानमंत्री आवास योजना वसाहतीतील घरकुल प्रकल्पांची कामे दर्जानुसार पूर्ण; सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई :- नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरणाद्वारे मौजा वाठोडा परिसरातील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलांची कामे दर्जानुसार पूर्ण झाली असून त्याठिकाणी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य विकास ठाकरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते.

मंत्री देसाई म्हणाले की, मौजा वाठोडा येथे २६४ आणि मौजा तरोडी (खुर्द) येथे ३,३१६ अशा एकूण ३,५८० घरकुलांची कामे १३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात आली असून, मंजूर विकास आराखड्यानुसार सर्व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

वाठोडा आणि तरोडी येथील प्रकल्पांमध्ये गाळेधारकांच्या नोंदणीकृत सहकारी संस्थांमार्फत मूलभूत सुविधा व देखभालीची जबाबदारी पार पाडली जाते.

योजनेतील सर्व कामे निविदेतील अटी-शर्ती आणि निर्धारित मानकांनुसार करण्यात आली असून, त्यांचे त्रयस्थ पक्ष तांत्रिक निरीक्षण व्हीएनआयटी नागपूर या संस्थेमार्फत करण्यात आले आहे. संस्थेच्या अहवालानुसार सर्व कामे गुणवत्तापूर्ण व नियमांनुसार पूर्ण झाल्याचे प्रमाणित करण्यात आले असल्याचेही मंत्री देसाई यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.