– ‘सावित्रीच्या लेकी’ महिला समुहाची बैठक उत्साहात
कन्हान :- अखिल भारतीय माळी महासंघ, शाखा टेकाडी च्या वतीने विजय वासाडे यांच्या निवासस्थानी महासंघाचा वर्धापन दिन, महिला आरोग्य शिबिर तसेच ‘सावित्रीच्या लेकी’ महिला समुहाची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रास्तावि कात प्रा. डॉ. मनोज होले यांनी अखिल भारतीय माळी महासंघाच्या स्थापनेपासुनच्या वाटचालीचा आढावा घेत संघटनेची उद्दिष्टे आणि समाज प्रबोधनातील कार्य स्पष्ट केले. महिला आरोग्य शिबिरात वैद्यकीय समुपदे शक दीक्षाताई अंजनकर यांनी “ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती व महिला आरोग्य” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी स्तन कर्करोगाची लक्षणे, कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, वेळेवर निदानाचे महत्त्व तसेच मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेबाबत सविस्तर माहिती दिली. उपस्थि त महिलांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. तदंतर झालेल्या ‘सावित्रीच्या लेकी’ महिला समुहाच्या बैठकीत सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, स्त्री-सक्षमीकरण आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच महिला व मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी संघटितपणे कार्य करण्याचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघाचे नागपुर जिल्हाध्यक्ष मनोज गणोरकर होते. त्यांनी समाजाच्या बळकटीसाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी रविंद्र गणोरकर, पत्रकार किशोर वासाडे, अजय अंजन कर, वसंत फसाटे, मनोज बोराडे, प्रभाकर बोराडे, हेमंत राऊत, अविनाश उमप यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर, महिला, युवक-युवती व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वि आयोजनासाठी वर्षा वासाडे, ज्योती वासाडे, माधुरी वासाडे, निता वासाडे, स्वाती होले, प्रगती आकोरे, रेशमा मोहाडे, दीपाली टाकळखेडे, विजया बोराडे, अनिता राऊत, वैशाली वानखेडे, निकिता नागतोडे, ममता मोहाडे, सारिका वासाडे, उज्वला मोहाडे, स्नेहा मोहाडे, सोनाली मोहाडे, आरती मोहाडे, लक्ष्मीकांता मोहाडे, प्रियंका कुरळकर, मोनाली टाकळखेडे, मंदा मोहाडे, मीरा राऊत, वसुंधरा राऊत, प्रणाली कुरळकर, हर्षा कुरळकर तसेच अखिल भारतीय माळी महासंघ, शाखा टेकाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.



