spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपुरात गुंड दिलीप ठाकर आणि टोळीला अटक; दोन वर्षांपासूनची दहशत संपुष्टात

 

नागपूर १ : गेल्या दोन वर्षांपासून नागपूरच्या दक्षिण-पूर्व भागात दहशत माजवणारा कुख्यात गुंड दिलीप ठाकर आणि त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री या टोळीने एकामागून एक दोन गंभीर गुन्हे केल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांना दिघोरी चौकाजवळून ताब्यात घेतले. या अटकेमुळे नागपूरकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

बुधवारी रात्री दिलीप ठाकर आणि त्याच्या टोळीने आधी उमरेड रोडवर एका व्यक्तीला लुटले आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर त्यांनी आदर्श नगरमधील एका घरात घुसून मारामारी केली आणि लुटमार केली. या दोन्ही घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. रात्री उशिरा दिघोरी चौकाजवळ या टोळीला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. चौकशीदरम्यान दिलीप ठाकरवर यापूर्वी चार खुनांसह १६ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या गुंडांच्या अटकेमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Popular Articles