नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या ‘अमृत २.०’ योजनेच्या कामांचा आढावा महापौर निता ठाकरे यांनी शुक्रवारी(ता.२४)घेतला. यावेळी त्यांनी अमृत २.० अंतर्गतसुरू असलेल्या कामांचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले तसेच सीवर लाईन टाकल्यानंतर रस्तेपूर्ववत करण्यास होणाऱ्या विलंब आणि कामाच्या दर्जाबाबत महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
बैठकीला स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, मनपा आयुक्त डॉ. विपीन तसेच अतिरिक्तआयुक्त अंकित, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी उपस्थित होते.
बैठकीत सर्वप्रथम सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या अधीक्षक अभियंताडॉ. श्वेता बॅनर्जी यांनी सांगितले की, “साउथ सिवरेज झोन अंतर्गत ५३७ किलोमीटरची सीवर लाईन टाकण्याचे काम सुरू आहे.यापैकी २६० किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम पुढील जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजितआहे. रस्ते पूर्ववत करण्याचेकामही सोबतच सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावर बोलताना महापौर निता ठाकरे म्हणाल्या की, “रस्ते पूर्ववत करण्याच्या कामाचा दर्जा सुधारणेअत्यंत गरजेचे आहे. सध्या सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांनामोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी नागरिकांचा अपघातही झाले आहेत. यावर तातडीनेउपाययोजना करणे आणि सर्व कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.” कामात सुधारणा न झाल्यास व नागरिकांचा त्रास कमी न झाल्यास संबंधित कंत्राटदारांवरकडक कारवाई केली जाईल, असा इशाराही महापौरांनी यावेळी दिला. त्यांनीचिटणीस नगर, पवनसुत नगर, गाडगेबाबा नगरया भागांसह संपूर्ण शहरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल तीव्र नापसंती दर्शवली.
स्थायीसमिती सभापती शिवानी दाणी वखरे यांनीही कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जयताळा आणि जयप्रकाश नगर या भागांत नागरिकांनाभेडसावणाऱ्या समस्यांकडे त्यांनी लक्ष वेधले व तेथे तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देशदिले. यावेळी सर्व कार्यकारी अभियंता, मनपाचे कर्मचारी अधिकारीउपस्थित होते.





