spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रणाग हायस्कूल आजनगाव येथे दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत दैनिक वृत्तपत्र वाचन उपक्रम

किशोर साहू, मौदा :- मौदा तालुक्यातील प्रणाग हायस्कूल आजनगाव येथे आज शनिवार (ता. 25 जुलै) ला दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती विकसित करण्याच्या उद्देशाने दैनिक वृत्तपत्र वाचन उपक्रम सुरू करण्यात आला .यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शालिनी बाभूळकर यांनी विद्यार्थ्यांना वृत्तपत्र वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले. नियमित वृत्तपत्र वाचनामुळे सामान्य ज्ञान, भाषिक कौशल्य, विचारशक्ती आणि चालू घडामोडींची माहिती वाढण्यास मदत होते.

तसेच सर्व विद्यार्थ्यांनी दररोज शाळेतील वृत्तपत्राचे वाचन करून ज्ञानात भर घालावी असे आवाहन केले.

विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद देत नियमित वृत्तपत्र वाचनाच्या संकल्प केला. सदर कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Popular Articles