spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

फाईल गहाळ प्रकरणाची चौकशी करून एफआयआर दाखल करा

– आमदार सुधाकर अडबाले यांचे शिक्षणाधिकारी यांना सभेत निर्देश

– विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची समस्या निवारण सभा

नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील १४ अनुकंपा, मान्‍यता प्रस्‍ताव, शालार्थ आयडी प्रस्‍ताव शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयातून गहाळ झाल्‍याची बाब अत्‍यंत गंभीर असून सदर प्रकरणाची तात्‍काळ चौकशी करून दोषींवर एफआयआर दाखल करा, असे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना सभेत दिले. यावर शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी तीन आठवड्यात चौकेशी करून अहवाल सादर करण्यात येईल, असे सांगितले.

आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत समस्‍या निवारण सभा २४ जुलै २०२६ रोजी सेंट उर्सुला हायस्कूल, नागपूर येथे पार पडली. ही सभा साडेतीन तास चालली.

सभेत अतिरिक्‍त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी समायोजन, शून्‍य शिक्षकी शाळा, आर्थिक वर्षापूर्वीची थकबाकी देयके, दि. २१-०२-२०२४ व ४-४-२०२५ शासन निर्णयानुसार झालेल्‍या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्‍या/मान्‍यता व प्रलंबित शालार्थ आयडी प्रकरणे, वेतनेत्तर अनुदान, खासगी अनुदानित शाळेच्या सर्व लेखाशिर्षकाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत आढावा, प्रलंबित मान्‍यता वर्धित व मंडळ मान्‍यता, प्रलंबित वैद्यकीय देयके, अर्जित रजा रोखीकरण, वरिष्ठ / निवड श्रेणी, प्रलंबित मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक मान्‍यता, प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणे, प्रलंबित अनुकंपा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वैयक्‍तिक मान्‍यता / शालार्थ आयडी, कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भ.नि.नि. परवाता / ना परतावा व अंतिम परतावा, भविष्य निर्वाह निधी पावती वितरणाची सद्यस्‍थिती, डीसीपीएस / एनपीएस पावत्‍याबाबतची सद्यस्‍थिती, वेतन पथक अधीक्षक कार्यालयात प्रलंबित वैद्यकीय देयके, अर्जित रजा रोखीकरण व इतर सामुहीक, वैयक्‍तिक प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. आमदार सुधाकर अडबाले यांनी प्रलंबित प्रकरणे वेळेत निकाली काढण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना दिले.

यावेळी माजी आमदार व्‍ही. यू. डायगव्हाणे, शिक्षणाधिकारी (माध्य.) अनिल दहीफळे, वेतन पथक अधीक्षक पाटील, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, जिल्हा कार्यवाह संजय वारकर, महामंडळ सदस्‍य विश्‍वास गोतमारे, महानगर अध्यक्ष विठ्ठल जुनघरे, महानगर कार्यवाह अविनाश बडे, वर्धा जिल्‍हा कार्यवाह महेंद्र सालंकार, विजय गोमकर, अरुण कराळे, लक्ष्मीकांत व्होरा, सचिन इंगोले, धनराज राऊत, रवींद्र बिजवे, प्रमोद अंधारे, शैलेश येडके, दिनेश ढगे, दिलीप बांबल, संजय वांगे, छत्रपाल राऊत, अभिनव ढोबळे, मुरलीधर काळमेघ व विमाशी संघाचे पदाधिकारी, सदस्य, जिल्ह्यातील समस्याग्रस्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Popular Articles