spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तलवारीसह फिरणारा युवक नवीन कामठी पोलिसांच्या ताब्यात

– गुप्त माहितीच्या आधारे धाड; ₹5 हजार किमतीची धारदार तलवार जप्त

कामठी :- शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नवीन कामठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी गुन्हेगारीविरोधात सुरू केलेल्या मोहिमेला एक यश मिळाले आहे. सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना धारदार तलवार बाळगून फिरणाऱ्या एका युवकाला नवीन कामठी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून अटक केली. आरोपीकडून सुमारे ₹5 हजार किमतीची जंगलेली धारदार तलवार जप्त करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गतरात्री 10.50 वाजताच्या सुमारास नवीन कामठी पोलीस ठाण्याचे पथक नियमित गस्त घालत असताना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार कुंभारे कॉलनी येथील विजय डोंगरे यांच्या घराजवळ सापळा रचण्यात आला. तेथे एक युवक सार्वजनिक ठिकाणी कोणताही कायदेशीर परवाना नसताना तलवार घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इरफान शोएब नूरुद्दीन शेख वय 27, रा. कुंभारे कॉलोनी, कामठी असे आहे. त्याच्याकडून 31 इंच लांबीची धारदार तलवार जप्त करण्यात आली. तलवारीचे पाते 26 इंच, मूठ 5 इंच असून तिची अंदाजे किंमत ₹5 हजार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये नवीन कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक भिताडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून. पुढील तपास नवीन कामठी पोलीस करीत आहेत.

Popular Articles