कामठी :- श्री राधा कृष्ण सेवा संस्था, कामठी परिवाराच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त भुषण नगर, येरखेडा (कामठी) येथील संस्थेच्या कार्यालयात रविवारी सकाळी ९.०० ते ९.४५ या वेळेत श्रद्धांजली व पुष्पहार अर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी २६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्धात अद्वितीय शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रभक्तीचे दर्शन घडवत भारताच्या संरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अमर वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळत शहीद जवानांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमात इंदू दुबे, आरती शर्मा, कृष्णा शर्मा, कुमकुम दुबे, लालसा कुशवाहा, महेश पांडे, लक्ष्मण शुक्ला, श्यामनाथ उपाध्याय, प्रफुल्ल शर्मा, प्रेमकुमार सिंह, हरेश्वर पाठक, श्रीराम कुशवाहा, कामेश्वर सिंह, केशव बडसकर, शिवचंद गुप्ता, दीपक पांडे, काशीनाथ मिश्रा, रमाकांत शर्मा, नंदकुमार सिंह, अशोककुमार दुबे, राजनारायण ओझा, गणेश वर्मा, हरिओम दुबे, अरविंद दुबे, श्रीओम दुबे, सत्यम दुबे, खेमचंद यादव, दिलीप शर्मा, मिथलेश ओझा, समीर ओझा, काशीनाथ पांडे, श्याम शर्मा यांच्यासह संस्थेच्या अनेक स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या शेवटी देशात कायम शांतता, सुरक्षितता, समृद्धी तसेच संपूर्ण विश्वात सुख-शांती नांदावी, अशी प्रार्थना करण्यात आली.
“कारगिलच्या वीर शहीदांचे बलिदान सदैव राष्ट्रासाठी प्रेरणादायी राहील,” अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.





